जागतिक पाणथळ दिन (wetland day)
Wetland day (पाणथळ प्रदेश दिन):
2 फेब्रुवारी
What are wetland? (पाणथळजमीन म्हणजे नेमकं काय....?)
नदी, तलाव, सागरी किनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला आढळतात. यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्सशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो.
सध्या आपण भूगर्भातील पाण्याचा भरपूर वापर करतो. या पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम असे प्रदेश करतात.
अनेकदा आपण प्रदूषित पाणी व इतर हानिकारक द्रव्ये अशा प्रदेशात फेकतो खरे; परंतु पाणथळ जागी वाढणा-या वनस्पतीच या घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात.
भातखाचरे आणि मत्सबीज – उत्पादनासाठी बनवलेली तळी हे देखील पाणथळ प्रदेशच असल्याने त्यांमधून जगभरातील ३ अब्ज लोकांना दररोजचे अन्न ( भात आणि मासे) मिळते.
सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किना-यांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते. शिवाय समुद्राचे आक्रमण थोपवून किनारी जमीन अतिक्षारयुक्त (निरुपयोगी खारपड) होण्याची क्रियाही तेथील ‘मॅनग्रुव’ (खारफुटी) प्रकारच्या झुडपांमुळे कमी होते.
नदीला पूर आल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यासही हे जास्तीचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशात मुरते व मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते.
How does it started? (सुरूवात कशी झाली..?)
इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किना-यावरील ‘ रामसर ‘ या शहरी ‘ पाणथळ प्रदेशाचे महत्त्व ‘ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती.
पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस ‘ वेटलँड्स डे ’ साजरा केला जावा असा निर्णय या परिषदेत घेतला गेला.
असा पहिला दिवस १९९७ साली साजरा झाला.
How wetland day is celebrated? ( पाणथळजमीन संवर्धन दिन कसा साजरा केला जातो...?)
शाळा, काॅलेज मध्ये वेगवेगळे उपक्रम घेवुन जनजागृती केली जाते.
पाणथळ जागांना भेट देऊन त्याचे संव॔धन केले जाते.
शासन आणि निसर्ग प्रेमी आपापल्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.
What are Moto behind celebration of this day..? (पाणथळजमीन संवर्धन दिन साजरा करण्याचे उद्दीष्ट काय..?)
दुर्दैवाने आज पाणथळ प्रदेशांकडे ‘वाया गेलेली जमीन’ म्हणूनच पाहिले जाते, पण जैविक आणि पर्यावरणीय साखळीतील त्यांचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन ते जतन करून, तिथला कचरा इ. दूर करून त्यांचा सजगतेने वापर करणे गरजेचे आहे.
प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वैयक्तिक पातळीवर सुध्दा पाणथळ प्रदेश वाचविण्याचा प्रयत्न केला तरी या दिशेने एक ठोस पाऊल उचलले जाऊ शकते.
आपल्या प्रत्येकाच्या खारीच्या वाटयाने पृथ्वीवरची ही महत्त्वाची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि पर्यावरणाची बूज राखली जावू शकते.
तर मित्रांनो कस वाटल ह्या दिना बद्दल वाचून, कांहीना कदाचित आधीच माहीत असेल पण ज्यांना माहिती नव्हतं त्यांना पण आज समजले असेल नक्कीच.. शासन आणि निसर्ग प्रेमी सोबतच आपणही आपला खारीचा वाटा ह्या निसर्गाला देवूया..माणूस कोणत्याही क्षेत्रातील असला तरी श्वास आपण सगळेच घेतोय..आता आपण भेटू या असाच एक दिन घेऊन लवकरच आपल्या पुढील लेखात "जागतिक वन्यजीव दिन" (World Wildlife Day) माहिती करून घेणार आहोत. हा लेख आवडल्यास नक्की लेख शेअर करा आणि तुमचे विचार सुध्दा..


Well done 👍🏻
ReplyDeleteVery informative 👍
ReplyDeleteKhup Chan shreya 👍 I am excited for ur next article
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteVery nice information
ReplyDelete👌👌
ReplyDeleteNice information 👍👌
ReplyDeleteNice 👍
ReplyDelete👍👍👍
ReplyDeleteVery nice information about wetland day,keep it up 👍
ReplyDeleteAll the best for next one
Nice information
ReplyDeleteNice👌👌👌
ReplyDeleteKhup chan Shreya 👌👌
ReplyDeleteKhup Chan
ReplyDeleteSundar✨👍
ReplyDeleteNice information 👌👌👍👍👍
ReplyDelete👍👍👍
ReplyDeleteNice information 👌👌
ReplyDeleteNice
ReplyDelete