एक नवीन प्रवास
नमस्कार मित्रांनो!
आजपर्यंत आपण सगळे वेगवेगळे दिवस साजरे करतो , अगदी शिव जयंती पासून व्हेलनटाईन डे पर्यंत सगळे दिवस आपल्याला माहिती असतात आणि ते आपण साजरे पण करतो . पण आपल्याकडे जल दिन , हत्ती दिन असे दिन साजरे केले जातात हे फार मोजक्या जणांना माहिती असेल . आपण आजचा दिवस बघतोय,जगतोय तो ह्या निसर्गामुळे पण आपणच त्याच्या निसर्ग चक्रांच्या आड जातोय ,ते बिघडत चालोय म्हणून असे दिन साजरे करण्याची गरज सरकारला आणि निसर्ग प्रेमींना पडली.
मित्रांनो असे दिवस ,त्यांचे महत्त्व, त्यांनची सुरूवात, उद्दिष्टे हे सगळे छोट्यांनपासून मोठ्यांपर्यंत समजावे आणि आपल्याला आपले कर्तव्य समजावे ह्या उद्देशाने निसर्गाप्रती एक खारीचा वाटा म्हणून हा उपक्रम आम्ही सुरू करीत आहोत. दिनदर्शिकेच्या दिवसांनुसार आपण एक एक दिन उलघडूया...
चला तर मग निसर्गाच्या पैलू बद्दल जाणून घ्यायला तयार व्हा ...आपण लवकरच भेटु आपल्या नवीन प्रवासाच्या पहिल्या लेखात आणि जाणून घेवू या पाणथळ प्रदेश दिनाबद्दल (wetland day) आणि आमच्या नवीन प्रवासाचे सोबती बना...
धन्यवाद!!!

Comments
Post a Comment