जागतिक पाणथळ दिन (wetland day)
Wetland day ( पाणथळ प्रदेश दिन) : 2 फेब्रुवारी What are wetland? ( पाणथळजमीन म्हणजे नेमकं काय.... ?) नदी , तलाव , सागरी किनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला आढळतात. यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे , मिठागरे , सांडपाण्याचे तलाव , मत्सशेती तलाव , शेततळी , भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो. सध्या आपण भूगर्भातील पाण्याचा भरपूर वापर करतो. या पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम असे प्रदेश करतात. अनेकदा आपण प्रदूषित पाणी व इतर हानिकारक द्रव्ये अशा प्रदेशात फेकतो खरे ; परंतु पाणथळ जागी वाढणा-या वनस्पतीच या घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात. भातखाचरे आणि मत्सबीज – उत्पादनासाठी बनवलेली तळी हे देखील पाणथळ प्रदेशच असल्याने त्यांमधून जगभरातील ३ अब्ज लोकांना दररोजचे अन्न ( भात आणि मासे) मिळते. सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किना-या...